झिपलाइन राईडवेळी पर्यटकाने टिपला दहशतवादी हल्ल्याचा थरार !   

अल्ला हू अकबर घोषणेनंतर गोळीबार सुरू झाल्याचा दावा

अहमदाबाद : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे आणि गोळीबाराचे थरारक चित्रीककरण येथील एका पर्यटकाने नळकत केल्याचे उघड झाले आहे. पर्यटनस्थळी झिपलाइन राईडवेळी घटनेचे चित्रिकरण झाले होते. ते समाज माध्यमांवर फिरत आहे. झिपलाइन राईडच्या चालकाने अल्ला हू अकबर, अशी तीनद ाघोषणा केल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याचा दावा त्याने केला.
 
ऋषी भट्ट, असे पर्यटकाचे नाव आहे. तो कुटुंबासह पहलगामच्या बैसरन खोर्‍यात गेला होता. २२ एप्रिल रोजी झिपलाइन राईडचा तो आनंद लुटत असताना त्याने सेल्फी स्टीकच्या माध्यमातून एक व्हिडिओ काढला. तो सुमारे ५३ सेकंदाचा आहे. त्यात नागरिक पळत असल्याची आणि दहशतववाद्यांनी गोळ्या झाडल्याचे आवाज ऐकू येत आहेत. एक जण गोळी लागून खाली पडत असल्याचे त्यात दिसत आहे. या संदभार्र्त भट्ट यांनी सांगितले की, बैसरन खोर्‍यात मी पत्नी आणि मुलासह पर्यटनासाठी गेले होतो. तेव्हा झिपलाइन राईडचा आनंद लुटण्याचा निर्णय घेतला. पत्नी आणि मुलगा यांनी सुखरूपपणे राईड घेतली आणि निश्चितस्थळी पोहोचले. तेव्हा माझी राईड सुरू झाली. मी उतरलो तेव्हा पहिली गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आला. मला असेही ऐकू आले की कोणीतरी धर्म विचारला आणि नंतर गोळी झाडली. तेव्हा िझिपलाइनवरुन मी उडी मारली आणि जेथे कुटुंब होते तेथे धावलो. एका ठिकाणी जेथे अन्य चार जण लपून बसले होते तेथे मी कुटुंबासह पोहोचलो. तेथे दडून बसलो. आठ ते दहा मिनिटांत गोळीबार थांबल्यानंतर सर्वजण पळालो आणि कशीबशी सुटका करुन घेतली.
 
भट्ट म्हणाले, बैसरन मैदानात दोन दहशतवादी होते. ते नागरिकांना धर्म विचारत होते आणि गोळ्या झाडत होते. चार ते पाच दहशतवादी असावेत. ते गोळ्या झाडत होते. दोन नागरिक जमिनीवर पडले होते. पण, झुडपातून आणखी किती दहशतवादी गोळ्या झाडत होते, याची कल्पना नाही. झिपलाइन चालकाने राईडसाठी नऊ जणांना पाठवले होते. मी राईडसाठी तयार झालो तेव्हा व्हिडिओसाठी सेल्फी स्टीक हाती धरली होती. चालकाने अल्ला हू अकबर, असा तीन वेळा जयघोष केला. नंतर गोळीबार सुरू झाला. तो मान खाली घालून शब्द उच्चारत होता. दुसर्‍या दिवशी व्हिडिओ पुन्हा पाहिल्यावर मला समजले की, अल्ला हू अकबर जयघोषानंतर गोळीबार सुरू झाला होता. पर्यटनास्थळी भारतीय लष्कर नव्हते. स्थानिक पोलिसांकडे सुरक्षेची जबाबदारी होती. सुमारे २० मिनिटांत लष्कर दाखल झाले आणि त्यांनी परिसर घेरला. आम्हाला सुरक्षित स्थळी आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांविरोधात येत्या १५ ते २० दिवसांत नक्कीच कारवाई करतील, अशी अपेक्षा भट्ट यांनी व्यक्त केली.
 

Related Articles